Maharashtra Weather | उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसून येत आहे. पुढील 3 दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी तर थंडीचा यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather )
सध्या संपूर्ण राज्यात थंडी वाढल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या भागांवर आता धुक्याची चादर दिसून येत आहे. मुंबईतही तापमानात घट होताना दिसत आहे. राज्यात निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. येथे पारा 8.3 अंशांवर पोहोचला होता.
पुढील 3 दिवस थंडीचा जोर वाढणार
पुण्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्याचे तापमान 9.9 अंशावर आले. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात आता शेकोट्या पेटल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा महाराष्ट्र राज्यावर देखील दिसून येत आहे. आता आलेले फेंगल हे चक्रीवादळ वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी आलेल्या दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले होते. आता फेंगलने चिंता वाढवली आहे. यामुळे देशातील दक्षिण भागात ऐन थंडीत पाऊस सुरू झाला आहे. (Maharashtra Weather )
‘या’ भागात थंडीची लाट येणार
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 3 दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. या वर्षातल्या हिवाळ्यात राज्यात सर्वात कमी तापमान पुण्यात नोंदवले गेले आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather )
News Title : Maharashtra Weather today
महत्वाच्या बातम्या –
“मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेऊन माझे बाबा..”; श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत
आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!
‘डायरेक्टर कट म्हटला तरी तो करतच राहिला….’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा