Maharashtra Weather | बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळा मुळे दक्षिणेकडील राज्यांना चांगलाच फटका बसलाय. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या वातावरणावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येतंय. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येतंय. (Maharashtra Weather)
राज्यात येणाऱ्या काही दिवसांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील हवामान सध्या ढगाळ व दमट होण्याचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडीही नाहीशी झाली आहे.
पुढील 3 दिवस पावसाचे
या बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याच्या देखील अनेक समस्या उद्भवताना दिसून येत आहेत. सर्दी, खोकला, ताप या या आजारात वाढ होत असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलंय. (Maharashtra Weather)
फेंगल चक्रीवादळाने सध्या कर्नाटकाच्या सागरी भागासह अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा दाब येत्या दोन दिवसात पुढे सरकणार असून हळूहळू कमकुवत होणार आहे. त्यामुळे तळकोकणातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातही पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात होणाऱ्या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रसह तळ कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. (Maharashtra Weather)
फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम हा कोकणावर दिसून येतोय. दक्षिण कोकणात 4 ते 6 डिसेंबर दरम्यान पाऊस पाडण्याची शक्यता आहे. सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामानात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे.
News Title – Maharashtra Weather today 4 December
महत्त्वाच्या बातम्या :
दिल्लीत दोन दिवसांपासून अजित पवार वेटिंगवर; अमित शाहांकडे ‘या’ मागण्या करणार?
आज देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार!
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?
मोठी बातमी! शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?; संभाव्य यादी जाहीर