पावसाची विश्रांती; ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Weather Update l गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने राज्यभर हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. कारण गेल्या आठवड्यापासून कोकणात पावसाचा जोर मंदावला असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.

पुढील दिवसांत पावसाची स्थिती काय असणार? :

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा जोर कमी होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असणार आहे. जुलै महिन्यात कोकणासह घाट माथ्यावर पावसाने जोर धरला होता. मात्र कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले होते. याशिवाय पुण्यात देखील पूराने थैमान घातले होते.

गेल्या महिन्यातील पावसाने राज्यातील 90 टक्के धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असणार आहे. तर, सप्टेंबरमध्ये देखील अशीच स्थिती असणार आहे. कारण पुढील दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण कोकणातीळ बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. याशिवाय राज्यात 15 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर देखील कमी असणार आहे.

Weather Update l लोणावळ्यात कास असणार वातावरण? :

राज्यातील कोकण विभागात माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र हवामान खात्याने मराठवाड्यात पावसाची शक्यता नसणार आहे. तर दक्षिण कोकणात देखील 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोणावळ्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली होती. त्यामुळे लोणावळ्यातील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. त्यानंतर पुढील तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. लोणावळ्यात मागील 24 तासात 36 मिमी पावसाची हजेरी लावली होती.

News Title : Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या-

या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता

14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत