Maharashtra Weather Update | पश्चिम बंगाल आणि चेन्नईकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हा महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update )
तर मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईत सध्या तापमानात घसरण झाल्याने गारवा जाणवत आहे. येत्या 2 दिवसात आणखी तापमान घटण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही रात्री उशिरा तापमानात घट होत आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे.
‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज
दुसरीकडे, पुण्यासह कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर 14-15 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीतही 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update )
राज्यात सध्या दिवसभर काही ठिकाणी उष्णता आणि रात्री गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर आज आणि उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. थंडीचा कडाका वाढला असतानाच पाऊस पडणार म्हटल्यावर थंडी आणखी वाढणार आहे.
थंडीचा कडाका वाढणार
बदलणाऱ्या वातावरणमुळे आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्दी-खोकला आणि व्हायरल ताप असे आजार आता डोके वर काढत आहे. त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृद्ध आणि लहान बालकांची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आरोग्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (Maharashtra Weather Update )
News Title – Maharashtra Weather Update 12 November
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?
“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा
गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
“आम्ही गांXची अवलाद नाही, कार्यकर्त्याला हात लावला तर..”; ‘या’ नेत्याचा गुलाबराव पाटलांना इशारा