Maharashtra Weather Update | राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सध्या बरसत आहे. हवामान विभागाने देशातील 10 राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही कोकणसह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. राज्यात आज 6 दसरा मेळावे होणार आहेत. राजकीय शक्तीप्रदर्शन या मेळाव्याद्वारे केलं जाईल. मात्र, आता या मेळाव्यांवरदेखील पावसाचं सावट दिसून येत आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने आजपासून पुढील 6 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.विदर्भात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मुंबईसह ‘या’ ठिकाणी पाऊस बरसणार
आज विदर्भातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबई आणि पुण्यातही पाऊस होईल. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर येथे सध्या जोरदार पाऊस पडतोय. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे देखील चांगलाच पाऊस पडतोय. मुंबई आणि ठाण्यात 14 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)
पालघर जिल्ह्यात देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे काढणीसाठी आलेल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. येथे अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
‘या’ राज्यांत देखील जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने 16 ऑक्टोबरपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update )
यासह देशभरात बोलायचे झाल्यास तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये आज 12 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. (Maharashtra Weather Update)
News Title – Maharashtra Weather Update 12 october
महत्वाच्या बातम्या-
महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, मिळणार अमाप पैसा!
लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
नवीन अपडेट्ससह KTM बाईक लाँच; जाणून घ्या किंमत
रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी