Weather Update l राज्यात जुलै महिन्यात पावसाने थैमान माजवलं होत. राज्यातील प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण या महिन्यात पाऊस अधूनमधून काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाने काढता पाय घेतला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
राज्यात पावसाने मारली दडी :
ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरांसह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस कमी झाल्याचे दिसत आहे. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील ढगांची गर्दी वगळता इतर भागांमध्ये देखील पावसाने दडी मारली आहे. मात्र आता हवामान खात्याने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान वाढत आहे. तर कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये देखील पुढील काही दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईचा देखील पारा वाढतच जाणार आहे. त्यामुळे राज्यात ऊन- सावल्यांचा खेळ सुरु असल्याचं दिसत आहे.
Weather Update l राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के पाऊस अधिक :
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.
या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा तब्बल 27 टक्के पाऊस जास्त पडला आहे. मात्र संपूर्ण देशाची सरासरी अंदाज पाहता यावर्षी सरासरीपेक्षा 5 टक्के अधिक पावसाची नोंद हवामान विभागाने केली करण्यात आली आहे. तसेच तमिळनाडू राज्यात सरासरीहून 92 टक्के आणि पुदुचेरीमध्ये तब्बल 86 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
News Title : Maharashtra Weather Update
महत्वाच्या बातम्या-
भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!
प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा ‘हा’ बडा नेता कॉँग्रेसच्या वाटेवर; भाजपला ठोकला रामराम
या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!
मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण
नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर