राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. जुलै महिन्यात राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या पावसाचे दिवस सुरू असले तरी देखील काही जिल्ह्यांमधून मात्र पावसाने काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने वर्तवला महत्वपूर्ण अंदाज :

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसानं विश्रांती घेतल्याने तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील वाढते तापमान हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पाहायला मिळणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता आहे. राज्यात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पावसाने दडीच मारली आहे. मात्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाच्या ढगांची पुन्हा दाटी होताना दिसून येत आहे.

Weather Update l पुन्हा पाऊस सक्रिय होणार? :

राज्यातील बदलते वातावरण पाहता पावसाची रिमझिम अधूमधून सुरू होताना दिसून येत आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढतच आहे. तसेच कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि राज्याच्या इतर भागांमध्ये देखील हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये देखील उकाडा वाढत असल्याचं दिसत आहे.

IMD च्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई, ठाणे व पालघरसह भागात देखील पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील बदलते वातावरण पाहता सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे.

News Title- Maharashtra Weather Update

महत्वाच्या बातम्या-

मोठी गुड न्यूज! रक्षाबंधनापूर्वीच सोनं झालं स्वस्त; काय आहेत किमती?

आज ‘या’ 5 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा

‘मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर…’; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं

माघार की नवा डाव?; बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय