Maharashtra Weather Update | मागच्या आठवड्यापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.मात्र, अजूनही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मुंबई सह अनेक ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे. तर, काही ठिकाणी आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. (Maharashtra Weather Update)
आज राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा येथे तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
‘या’ ठिकाणी पाऊस होणार
तर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडीप घेणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील. (Maharashtra Weather Update)
मागीक काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या अनेक ठिकाणी पाऊस उघडला आहे. यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे.विविध भागात फवारणी, खुरपणीची कामे सुरू आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात उद्यापासून दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यामुळे विदर्भाला दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
आज मराठवाड्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना यासह अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे.
News Title : Maharashtra Weather Update 15 september
महत्वाच्या बातम्या-
आज ‘या’ 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा, सर्व संकट होणार दूर!
पुणे हादरलं! महिला पोलिसाचा धक्कादायक कारनामा
विधानसभेपूर्वीच भाजपकडून जोरदार बॅनरबाजी; फडणविसांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
पुणेकरांनो गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘हे’ 17 रस्ते राहतील बंद, पर्यायी मार्ग कोणते?
कीर्तन कार्यक्रमावरून घरी परतत असतानाच काळाचा घाला, धुळ्यात 4 जण जागीच ठार