जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?

Weather Update l दिवसेंदिवस राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र या वाढत्या थंडीने शेतकऱ्यांच्या द्राक्ष या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्याला थंडीचा आणि पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा अलर्ट :

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अशांहून तापमानाची नोंद झाली आहे. तर दुपारच्या सुमारास तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात देखील पहाटेच्या सुमारास तापमानात घट होत आहे. याशिवाय दिवसा दमट हवामान होत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने शेतकऱ्यांना महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. कारण राज्यात पुढचे तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर 11 जानेवारीपासून राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे. तसेच 8 ते 10 जानेवारीला रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Weather Update l ‘या’ तारखेदरम्यान पाऊस हजेरी लावणार :

राज्यातील तापमानात घेत होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशांहून खाली आला आहे. तर जळगाव शहराचं तापमान हे 8.2 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. याशिवाय जळगावमध्ये रात्रीचा पारा 6 ते 7 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 11 ते 15 जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. तसेच पाऊस देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर 18 जानेवारीपासून पुन्हा राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

News Title – Maharashtra weather updates