Maharashtra Weather Update | राज्यात कोकण भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजूनही कोकण भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 20 तारखेपर्यंत येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पासून 20 तारखेपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात (Maharashtra Weather Update) आला आहे. तर पालघर , ठाणे, मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच पुण्याला यलो तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय असल्याने बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे.
‘या’ भागाला पाऊस झोडपणार
आज कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आज रायगडमध्ये जोरदार (Maharashtra Weather Update) पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
पुण्यात कसं राहील हवामान?
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस (Maharashtra Weather Update) मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात यलो अलर्ट देण्यात आलाय.
News Title – Maharashtra Weather Update 17 july
महत्त्वाच्या बातम्या-
निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य
‘लाडका भाऊ योजने’साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
“वसंत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा करा”; मनसे नेत्यांकडून मागणी
“सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या..”; आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत