शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?; IMD चा महत्वाचा अंदाज

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातून पावसाने आता पूर्णतः माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे. राज्यात सकाळी थंडी दुपारी उष्णता आणि रात्री पुन्हा थंडी असं वातावरण दिसून येतंय. आजपासून थंडीचा कडाका आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. (Maharashtra Weather Update )

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा, पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. तसेच नाशिक, निफाडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तापमानात मोठ्या प्रमाणात घट

विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील तापमानात मोठी घट झाल्याची दिसून येत आहे. येथे किमान तापमानाचा आकडा 15 अंशांवर आला आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्येही सकाळी आणि रात्री गारठा वाढला आहे. तर दुपारी उष्णता वाढल्याने उकड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. (Maharashtra Weather Update )

पुण्यातही सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहेत. सातारा, पुणे व कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरात धुके वाढणार असल्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

उत्तर भारतातील राज्यांत दाट धुक्याची चादर

यावर्षी राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरु झाला होता. यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.  आता पाऊस राज्यातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.  जवळपास सर्वच भागात तापमानात आता घट होताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update )

तर, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिल्ली, बिहारमध्ये प्रचंड धुके पहाटे दिसून येत आहे.त्यातच राजधानी दिल्लीत आधीच प्रदूषण आणि त्यात दाट धुक्याची चादर पसरल्याने येथील हवेची गुणवत्ता खूप घसरली आहे. सकाळी घराबाहेर पडणे देखील येथे अवघड झाले आहे.

News Title : Maharashtra Weather Update 18 November 2024  

महत्वाच्या बातम्या –

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?

शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

“माझा भांग वाकडा करू शकेल, असा कुणी पृथ्वीवर नाही”; भाजप खासदाराचं वक्तव्य

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह अंगलट, फटाक्यांची ठिणगी उमेदवाराच्या केसावर पडली अन्..

मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना ‘या’ उमेदवारावर जीवघेणा हल्ला, कोल्हापुरात खळबळ