राज्यात पुन्हा पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | पावसाने पुन्हा एकदा राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. सध्या मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज 21 ऑगस्टरोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

News Title- Maharashtra Weather Update 21 august 2024

महत्त्वाच्या बातम्या –

हुंदाई कंपनी टाटा सफारीला देणार टक्कर; होणार भन्नाट कार लाँच

पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याला ईडीकडून अटक; घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करताय? तर ही बातमी वाचाच

“माझी पोलीस सुरक्षा काढून घ्या आणि..”; सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मोठी मागणी