Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील 36 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तर, उर्वरित राज्यात उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या कुठे ऊन तर कुठे पाऊस असं वातावरण दिसून येत आहे. (Maharashtra Weather Update )
परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज 21 ऑक्टोबररोजी देखील हवामान विभागाने राज्यात जोरदार पावासाचा इशारा दिला आहे. पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
आज मुंबईसह कोकण , पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याचबरोबर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यमतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update )
महाराष्ट्रात पावसाला पोषक असं वातावरण सध्या तयार झालं आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काल मुंबईत जोरदार पाऊस झाला. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अजून तीन दिवस मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update )
News Title : Maharashtra Weather Update 21 october
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कॉँग्रेसचे ‘इतके’ उमेदवार निश्चित?, समोर आली यादी
आज सोमवारी, भोलेनाथ कोणत्या राशीवर प्रसन्न होणार?, वाचा राशी भविष्य
कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची लेक, भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे
पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट; पाहा कोणाचं तिकीट कापलं
‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार