Maharashtra Weather Update | अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. आज मुंबई आणि उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने आज (21 सप्टेंबर) कोकण, गोवा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज विदर्भासह ‘या’ भागात पावसाची हजेरी
आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत पालघर, ठाणे, रायगड येथे विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे, सातारा, नंदुरबार, नाशिक येथे देखील विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सध्या येथे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. (Maharashtra Weather Update)
आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सून सध्या परतीच्या वाटेवर असल्याने पुढील काही दिवस परतीच्या सरी बरसतील. यंदा मॉन्सून उशिराने परतणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
पुण्यात कसं राहील हवामान?
पुणे व परिसरात आज 21 सप्टेंबररोजी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपार किंवा संध्याकाळी हलक्या सरी बरसतील. तर उद्यापासून तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
News Title – Maharashtra Weather Update 21 September
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!
जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?
घरच्या घरी बनवा ‘हा’ फेसवॉश; आठ दिवसात मिळेल कोरियन ग्लास स्कीन
‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!