Maharashtra Weather Update | जवळपास दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. आज 22 ऑगस्टरोजी देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.(Maharashtra Weather Update)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याचबरोबर कोकणात देखील वादळी वाऱ्याचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज
विदर्भात देखील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागात पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे.
तर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे आजपासून 25 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या तीन(Maharashtra Weather Update) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
तसेच, पुढील सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर , जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.(Maharashtra Weather Update)
तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
News Title : Maharashtra Weather Update 22 august 2024
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांच्या पुढे, जाणून घ्या लेटेस्ट दर
“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात
बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांबाबत घेतला मोठा निर्णय!
व्यवसायात भरभराट ते धनप्राप्तीचा योग, ‘या’ राशींचे येणार सोनेरी दिवस
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलयं तर अशाप्रकारे ब्लॉक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस