Maharashtra Weather Update | राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. मागच्या आठवड्यापासून पावसाने बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली आहे. आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल 23 जूनरोजी मुंबईत आणि पुण्यात व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.आता हवामान विभागाने नवी अपडेट दिली आहे. पुढील 24 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
यासोबतच मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज पासून पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह रायगड, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूरच्या घाट (Maharashtra Weather Update ) विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मॉन्सूनची बहुतांश जिल्ह्यात हजेरी
विदर्भात देखील वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. येथे वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी असेल. याचबरोबर पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यात मॉन्सूनने देखील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात (Maharashtra Weather Update ) जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
News Title – Maharashtra Weather Update 24 june
महत्त्वाच्या बातम्या-
“शिक्षणाचे माहेरघर पुणे आता ड्रग्ज आणि पबचं होतंय माहेरघर”; या नेत्यानी साधला निशाणा
“गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके..”; संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; 1 जुलैपासून होणार मोठा बदल
लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?
सोनाक्षी-झहीरने ग्रँड रिसेप्शन पार्टीत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल