Maharashtra Weather Update | राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे. कुठं जोरदार पाऊस पडतोय, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. अशात हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज (25 जून) कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
यासोबतच विदर्भामध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज पासून पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह रायगड, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूरच्या घाट (Maharashtra Weather Update ) विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याचबरोबर पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन
राज्यात मॉन्सूनने देखील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळे आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात (Maharashtra Weather Update ) जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी देखील सुखावले आहेत. मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन केलंय. त्यामुळे सध्या तरी शेतकरी वर्ग चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
News Title – Maharashtra Weather Update 25 june
महत्त्वाच्या बातम्या-
सामान्य माणसाने खायचं तरी काय?; भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला
खासदार झाल्यानंतर कंगना रनौतने केली सर्वात मोठी घोषणा!
“तुला जिवंत राहायचं की नाही?”; नवनाथ वाघमारेंना जीवे मारण्याची धमकी
पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!
‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या खुलाश्याने सिनेसृष्टी हादरली!