मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Weather Update

Weather Update | राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात सध्या पाऊस पडत आहे. मात्र, विदर्भातील अनेक जिल्हे अद्यापही कोरडेच आहेत. पूर्व विदर्भात पावसाचा अद्याप पत्ताच नसल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चांगला पाऊस अद्याप झाला नसल्याने शेतीची कामे अजूनही सुरू झाली नाहीत.

त्यामुळे बळीराजाच्या चिंतेते वाढ झाली असून शेतकऱ्यांचा जीव आता टांगणीला लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे राज्यातील इतर भागांना पावसाने झोडपून काढले आहे. अशात हवामान विभागाने आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे अजूनही कोरडेच

पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून हवामान विभागाने विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना सातत्याने यलो अलर्ट दिला आहे.

मात्र, या अंदाजानुसार अद्याप तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाहीये.त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत बसले आहेत. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक (Weather Update) ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार (Weather Update) पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यासोबतच ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

News Title – Maharashtra Weather Update 26 june 

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?

“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”

“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

वयाच्या 50 शीत मलायकाला प्रेमात मिळाला धोका?; अर्जुनच्या वाढदिवशी केली क्रिप्टिक पोस्ट

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ घोषणा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .