राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update | राज्यात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यात पहिल्यांदाच पावसाने रेकॉर्ड मोडला. येथे बरीच घरे अक्षरश: पाण्याखाली गेली. मुंबईतही पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली. काही विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली. सध्या तरी पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) दिला आहे.

राज्यात आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नगरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज काही जिल्ह्यात यलो तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

कोकणमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्याला यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. आजपासून पुढील पाच ते सात (Maharashtra Weather Update) दिवस मध्य महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

विदर्भात 30 आणि 31 जुलै व 1 ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 27 जुलैरोजी साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्याच्या घाट विभागात देखील तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता (Maharashtra Weather Update) आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

News Title –  Maharashtra Weather Update 27 july 

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!

‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर

“गुजरातमधून तडीपार केलेला माणूस..”; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार!