सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Weather Update | कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन ते तीन दिवस या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सिंधुदुर्गला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे.

पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्रीच्या खोऱ्यात पाहायला मिळत आहे. यामुळे कर्ली नदी, गडनदी, तेरेखोल नदी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आजही कोकणातील बऱ्याच भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.

यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि (Weather Update)सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

आज राज्यात कसं असेल हवामान?

तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील (Weather Update) जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असेल.

विदर्भामधील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील सर्वच भागात पावसाची स्थिति निर्माण झाली आहे.

News Title – Maharashtra Weather Update 27 june 

महत्त्वाच्या बातम्या-

उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; 10 ग्रॅमचे भाव फक्त..

सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; 1 रुपयात पीक विम्याच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर

…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?

पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना