सतर्क! वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात सातत्याने हवामानामध्ये बदल होत आहेत. राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे जोरदार पाऊस, अशी हवामानस्थिती दिसून येत आहे. देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशातील 70 टक्के धरणे आता भरली आहेत. यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याचा कही पिकांना फायदा तर काही पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  (Maharashtra Weather Update )

सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत कच्छमध्ये जोरदार पाऊस झालाय. सौराष्ट्र आणि कच्छ भागातही सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. गुजरातमध्ये अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. कमी दाबाचा पट्टा  केरळच्या मध्यापासून दक्षिण गुजरातपर्यंत सक्रिय असल्याने पावसाचा जोर वाढला. त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळाला.

राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट

राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने आज 31 ऑगस्टरोजी काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने आज दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  (Maharashtra Weather Update )

आज पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा मुक्काम वाढणार?

दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात कोकण, गोवा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 2 दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होईल.वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असेल. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होईल.तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.  (Maharashtra Weather Update )

News Title- Maharashtra Weather Update 31 august 

महत्वाच्या बातम्या-

गणेशोत्सवात ‘या’ नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे घ्या दर्शन, सर्व संकटे होतील दूर

महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा!

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकी संदर्भात मोठा निर्णय!

‘या’ लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार? जाणून घ्या लाभ कसा मिळतोय?

गणपती बाप्पा संदर्भात महत्वाची बातमी; थेट होणार पोलिसांची कारवाई