घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather update | देशात केरळसह काही राज्यामध्ये मौसमी पाऊस दाखल झाला आहे. राज्यात 10 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.मात्र, त्यापूर्वी राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या तीव्र झळामुळे आता घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे.

‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार

आज 31 मे रोजी विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज व उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात 31 मे ते 1 जूनपर्यंत हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भागात नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

या उलट हवामान विभागाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे 2 व 3 जून रोजी मेघगर्जनासह वीजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस (Maharashtra Weather update ) पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुण्यात कसं राहील तापमान?

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर व परिसरात आज पासून पुढील दोन ते तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

त्यानंतर 3 ते 5 जून दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे दिवसा वातावरण (Maharashtra Weather update ) मुख्यत: निरभ्र राहील.

News Title – Maharashtra Weather update 31 May 

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा फॉर्मुला ठरला!… तर यांची वर्णी लागणार

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रेल्वेने प्रवास करत असाल तर थांबा…अन्यथा

आज या राशीच्या व्यक्तींना धन प्राप्तीचे योग जुळून येतील