राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा (Maharashtra Weather Update) अंदाज आहे.

हवामान विभागाने आज (8 ऑगस्ट) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाची विश्रांती

सध्या समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत स्थिर आहे. यामुळे आज आणि उद्या कोकण व विदर्भात बहुतेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील सध्या ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे येथे देखील पाऊस होईल. (Maharashtra Weather Update)

आज विदर्भातील गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.  त्यामुळे त्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात देखील आजपासून पुढील चार-पाच दिवस वादळी वाऱ्याचा पाऊस होईल.

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

याचबरोबर पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता (Maharashtra Weather Update) आहे.त्यामुळे येथे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर येथे देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.

News Title :  Maharashtra Weather Update 8 august 

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?, थेट दिल्लीतून मोठी बातमी

विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..

मोठी बातमी! ”या’ योजनेअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार ‘इतके’ रुपये

समंथाचा एक्स नवरा पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीशी थाटणार दुसरा संसार

RBI चे नवीन पतधोरण जाहीर; तुमचा कर्जाचा EMI वाढणार की घटणार?