Maharashtra Weather Update | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे. सध्या कुठे थंडी तर कुठे उष्णता असं वातावरण दिसून येत आहे. पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर होणार आहे. (Maharashtra Weather Update)
सध्या मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईतही पहाटे गारवा जाणवत आहे. तर दिवसभर उकाडा जाणवू लागला आहे. पुण्यात देखील सकाळी थंड वारे वाहत असून धुक्याची चादरही दिसू लागली आहे. राज्यात, सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
15 नोव्हेंबरनंतर थंडी वाढणार
दिवाळीनंतर राज्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा सर्वाधिक खाली घसरला आहे. तर, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता शेकोट्यांचा आधार घेत आहेत. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)
15 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे.वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढू शकतात, त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोणत्या भागात किती तापमान नोंद झाली?
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यापाठोपाठ पुण्यात 15.2 अंश सेल्सिअस, जळगाव 15.8 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 15.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 17.8 अंश सेल्सिअस, सातारा 16.6 अंश सेल्सिअस, परभणी 18.3 अंश सेल्सिअस, नागपूर 18.6 अंश सेल्सिअस, सांगली 14.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. (Maharashtra Weather Update)
News Title – Maharashtra Weather Update 9 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर
नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’
देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत
आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य