राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने आज 9 ऑक्टोबररोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

‘या’ भागात जोरदार बरसणार

मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील सातही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनासह वीजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. एकंदरीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हयामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

10 ऑक्टोबरपर्यंत रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा व मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर , जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

पुण्यात कसं राहील हवामान?

पुण्यात पुढील दोन दिवस दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather Update)

News Title –  Maharashtra Weather Update 9 october 

महत्वाच्या बातम्या- 

आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त?, काय आहेत सध्या 10 ग्रॅमचे भाव?

“महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार”; देवेंद्र फडणविसांचा विश्वास

आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा

आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!