राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!

Weather Updates

Weather Update l राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीला सुरवात केली आहे. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी राज्यात 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा मोठा असणार आहे.

मुंबईसह कोकणात कोसळणार पाऊस :

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात बहुतेक भागात पाऊस बरसणार आहे. त्यामुळे आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला दोन ते तीन दिवस पावसाने चांगलंच झोडपलं आहे. त्यामुळे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी देखील बरसण्याचा अंदाज आहे.

अशातच दक्षिण कोकणात आज अनेक आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळणार आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण विभागात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखी वर्तवली आहे.

Weather Update l विदर्भात पावसाची दाट शक्यता :

हवामान विभागाने मुंबईत गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच आज मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात विदर्भात पुढील तीन ते चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट देखील जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. राज्यातील अकोला, वाशिम,बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

News Title – Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या

ज्योती मेटेंची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा!

पुढील दोन दिवसात या राशीचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा

“अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायचीये, पण जयंत पाटील ठरतायेत अडचण”

ऐश्वर्या रायच्या अनेक गोष्टी पटत नाहीत, चारचौघात जया बच्चन मनातलं बोलून गेल्या!

जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; त्वचेवरही होतात वाईट परिणाम

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .