Maharashtra Weather Update | वातावरणात (Atmosphere) सतत बदल होत आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) तापमानात (Temperature) अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचे (Illnesses) प्रमाण देखील वाढले आहे. (Maharashtra Weather Update)
भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) पुढील आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली असून, सतर्कतेचा इशारा (Alert) दिला आहे.
हवामान विभागानुसार येत्या २४ जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह (Snowfall) पावसाची शक्यता आहे. तसेच, थंडीच्या लाटेचा (Cold Wave) इशारा देखील देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३६ तासांमध्ये जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
इतर राज्यांत थंडी वाढणार; महाराष्ट्रात (Maharashtra) हवामान कोरडे (Dry)
हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात जम्मू-काश्मीर आणि परिसरातच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर राज्यांत मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
रब्बी पिकांना (Rabi Crops) फायदा
वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक (Beneficial) असून, शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळणार आहे. जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. (Maharashtra Weather Update)
Title : Maharashtra Weather Update Cold wave to intensify in Maharashtra Rain likely in some states