Weather Update l गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जाणवणाऱ्या थंडीच्या कडाक्यात आता घट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या वेळी प्रचंड गारठा (Cold) जाणवत होता, तर दुपारी तीव्र उन्हाचा (Hot Sun) चटका बसत होता. पुणे (Pune) आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) काही भागांत किमान तापमान (Minimum Temperature) १ ते ३ अंशांनी वाढल्याने, तापमान स्थिरावले आहे.
मराठवाड्यात तापमानात वाढ, विदर्भात गारठा कायम :
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने मराठवाड्यात पुढील ३ ते ४ दिवसांत किमान तापमानात (Minimum Temperature) २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू तापमान पुन्हा कमी होईल. विदर्भात (Vidarbha) मात्र, पुढील ४८ तास तापमानात फारसा बदल होणार नाही.
Weather Update l राज्यातील तापमानाची सद्यस्थिती :
राज्याच्या विविध भागांत तापमानाची नोंद १०° ते १९° सेल्सिअस दरम्यान होत आहे. पुण्यात (Pune) किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. नाशिक (Nashik), कोल्हापूर, नगर (Nagar), सातारा (Satara) आणि सोलापूर (Solapur) सारख्या ठिकाणी तापमान ११° ते १६° सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे.
मराठवाड्यात (Marathwada) तापमान साधारणपणे १४° ते १७° सेल्सिअस दरम्यान आहे. तर विदर्भातील (Vidarbha) काही ठिकाणी, जसे भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यात किमान तापमान १०° ते १३° सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे.
हवामान राहणार कोरडे :
मराठवाड्यात (Marathwada) हवामान (Weather) अधिक कोरडे (Dry) राहण्याची शक्यता आहे. २२ आणि २३ जानेवारी रोजी उत्तर भागात सकाळी धुके (Fog) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात (Temperature) कमालीचा बदल नसून, दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात (Minimum Temperature) हळूहळू वाढ होईल.
News Title : Maharashtra Weather Update: Cold Wave to Subside, Dry Weather Predicted for Next 5 Days