उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update | देशासह राज्यात सध्या सूर्याचा प्रकोप दिसून येत आहे. दिल्लीत तर तापमान 50 अंशांच्याही पुढे गेलं आहे. राज्यात देखील बऱ्याच ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

उन्हात आता घराबाहेर पडताना चार वेळा विचार करावा लागत आहे. मोल-मजुरी करणाऱ्यांचे तर उन्हात प्रचंड हाल होत आहेत. उष्माघाताचे देखील अनेक जण बळी ठरले आहेत. देशभरात 60 हून अधिक जणांनी उष्माघातामुळे आपला जीव गमावलाय.

‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

आता नागरिकांना उन्हापासून काही अंशी दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.राज्यात बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेने दिलीये. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता दिली आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे कोकणात सिंधुदुर्ग वगळता (Maharashtra Weather Update) उर्वरित जिल्ह्यात पुढील एक ते दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत 4 ते 6 जूनला, सिंधुदुर्गमध्ये 3 ते 6 जून पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुण्यात कसं राहील तापमान?

पुणे व परिसरात आज आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे. पुण्यात 3 ते 5 जूनपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. तर काही ठिकाणी (Maharashtra Weather Update) हलक्या पावसाची शक्यता आहे.

News Title –  Maharashtra Weather Update june 

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

आयफोनला टक्कर देण्यासाठी रियलमीचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?

प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार