महत्त्वाची बातमीः सावध राहा, राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार असल्याचा इशारा

Maharashtra Weather | राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढलं. यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागात पावसाने जोर लावला आहे. बेमुदत पावसासह वादळी वाऱ्यांचा पाऊस पाहायला मिळत आहे. यामुळे काही ग्रामीण भागात नुकसान होताना दिसत आहे. शेतपिकांसह काही घरांची कौलं उडून गेल्याचं पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather)

राज्यात काही भागांमध्ये येत्या 24 तासात अवकाळी पाऊस

अशातच आता मुंबईमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. मुंबई शहर आणि इतर जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. यामुळे वातावरण हे ढगाळ राहणार असून तापमान हे 34 अंश सेल्सिअस पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Weather)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Maharashtra Weather) मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ आणि सोसायट्याचा वारा 40-50 किमी वेगाने हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसायट्यांच्या वाऱ्यासह मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यंदाच्या वर्षी मान्सून हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हा हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. हा अंदाज खरा होईल. कारण यंदा केरळमध्ये पाऊस लवकर दाखल झाल्याचं समजतयं. यंदा मान्सून हा 1 जून दरम्यान आपली हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

‘या’ भागात उष्णतेची लाट

अकोला, जळगाव, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड पुढील 48 उष्णतेची लाट येणार असून सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला चंद्रपूरात सर्वाधिक तापमान असेल असा अंदाज हवामान अभ्यासकाने वर्तवला आहे.

News Title – Maharashtra Weather Update Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य आग ओकतोय! देशभरात 60 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू

‘अशा’ व्यक्तींवर लक्ष्मीची नेहमी कृपा असते!

जून महिन्यात ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

तापमान गेलं चाळीशी पार; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हार्दिक पांड्या; घटस्फोटानंतर नताशाला..