Weather Update Today | राज्यात या आठवड्यापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मॉन्सूनने देखील संपूर्ण देश व्यापला आहे. आज (3 जुलै) राज्यात काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज बऱ्याच भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट (Weather Update Today ) देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
यासोबतच आज नंदुरबार, पालघर, ठाणे तर उद्या नाशिक , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येथे वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असेल. त्यामुळे (Weather Update Today ) या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात कसं राहील वातावरण?
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आजपासून पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी (Weather Update Today ) मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
News Title : Maharashtra Weather Update Today 3 july
थोडक्यात बातम्या-
पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं
चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?
तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर