Maharashtra Weather Update | फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात सध्या धो-धो पाऊस बरसत आहे. या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्यात अवकाळी संकटाचा सामना करावा लागतोय. (Maharashtra Weather Update)
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये आज (6 डिसेंबर) सकाळपासूनच जोरदार पावसाने हजारी लावली आहे. याशिवाय परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात देखील सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत. या जिल्ह्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली असून आज ते 21 अंश राहण्याचा अंदाज आहे.
‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार
हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम हे संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येत आहेत. त्यामुळे थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Maharashtra Weather Update)
पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. हिवाळ्यात बरसणाऱ्या पावसामुळे रब्बी पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस आणखी पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता ही आणखीच वाढली आहे. कोकणात देखील सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील 3 दिवस काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
‘या’ राज्यांनाही पाऊस झोडपणार
पावसामुळे आरोग्याच्या समस्या देखील समोर येत आहेत. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. येत्या काही दिवसांत देशभरात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. ओडिशा, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातही हलका पाऊस पडू शकतो. (Maharashtra Weather Update)
News Title- Maharashtra Weather Update today 6 December
महत्वाच्या बातम्या-
फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर
शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
आज धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ!
मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?, अमृता फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं