काळजी घ्या! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Weather Updates

Maharashtra Weather Update | हवामान विभागाने आज (6 जुलै) राज्यातील बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

याचबरोबर कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना देखील पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर, कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर घाट विभागातील पुणे, सातारा व कोल्हापूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट (Maharashtra Weather Update) देण्यात आलेला आहे.

आजपासून पुढील दोन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना नांदेड या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असेल. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात कसं राहील वातावरण?

पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश (Maharashtra Weather Update) सामान्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस येथे दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर सायंकाळी पावसाची शक्यता आहे.

News Title : Maharashtra Weather Update Today 6 july 

महत्वाच्या बातम्या-

ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं फक्त..

सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार; बटाटा-कांदा-टोमॅटोचे भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात अमृता फडणवीस अन् लेक दिविजाच्या लुकने वेधलं लक्ष; पाहा Video

“आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी”; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबईकरांनो ‘या’ कारणामुळे मुंबईतील ‘हे’ रस्ते 4 दिवस बंद राहणार; असा असणार पर्यायी मार्ग

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .