Maharashtra Weather Update | राज्यात पुढील पाच दिवस बऱ्याच भागात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम असल्याने कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
आजपासून 10 जुलैपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, आज 7 जुलैरोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर), जालना, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात 10 तारखे पर्यंत सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज छत्रपती संभाजी नगर, जालना व नांदेड या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असेल. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यासोबतच कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना देखील पुढील (Maharashtra Weather Update) काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
पुण्यात कसं राहील वातावरण?
पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला (Maharashtra Weather Update) आहे.
News Title : Maharashtra Weather Update Today 7 july
महत्वाच्या बातम्या-
16 वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ खटल्याप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता!
“ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की”; ‘धर्मवीर-2’चा टीझर पाहिलात का?
वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट; शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
आनंदवार्ता! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट