Maharashtra Weather Update | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांना मोठा फटका बसला. महाराष्ट्रातही यामुळे अनेक ठिकाणी पाऊस झाला. ऐन हिवाळ्यात पाऊस झाल्याने राज्यातून थंडी नाहीशी झाली होती. मात्र, कालपासून पुन्हा गारठा जाणवू लागला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान 10 ते 20 अंशाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Update )
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात गारठा वाढला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर या भागातील तापमानातही घट झाल्याने हुडहुडी भरल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात 17.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्येही थंडीचा पारा पुन्हा घसरला आहे.
थंडीचा जोर वाढणार
काल नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळे शहरात तापमान 9.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. पुण्यातही थंडी वाढल्याचे चित्र आहे. पुण्यात काल रविवारी, 16 अंशांवर तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने 18 डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update )
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात देखील थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
या सततच्या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. थंडी, ताप आणि सर्दीच्या रुग्णांची वाढ होत असल्याचे चित्र आहे. आता पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. (Maharashtra Weather Update )
News Title : Maharashtra Weather Update today
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 7000 रुपये, काय आहे नवी योजना?
“मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर ठरवा, आधी…”; ‘या’ बड्या नेत्याची महायुतीकडे मोठी मागणी
आज दुर्गाष्टमीला देवी दुर्गा ‘या’ राशींना देणार सुख-समृद्धी, धनलाभाचे देखील संकेत
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!
मोठी बातमी! मागच्या सरकारमधील ‘या’ दोन मंत्र्यांचा पत्ता कट होणार?