Weather Updates l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यात पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु :
बदलत्या वातावरणामुळे राज्यातील हवामानाचा ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसू शकतो.
याशिवाय राज्यातील पुणे, धुळे, सोलापूर, जळगाव, सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या 10 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये देखील काही भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
Weather Updates l मुंबईमध्ये वातावरण कसे असणार? :
गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईत तात्पुरता गारवा जाणवला मात्र त्यानंतर मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहेअशातच पुढील काही दिवस मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस गरमी सहन करावी लागणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दहा दिवसाने म्हणजेच 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर त्यापुढील वातावरण पोषक असणार आहे तर मान्सून 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
News Title – Maharashtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या
“मोदीजी आता कांद्यावर बोला”; मोदीजी म्हणतायेत जय श्रीराम
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून धनलाभ होईल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचं दुर्लक्ष
“मुंबईत माणसं नाही तर जनावरं राहतात”; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त विधान
“…तर सोनाली बेंद्रेला मी किडनॅपच केलं असतं”, शोएब अख्तरच्या वक्तव्यावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया