‘या’ कारणामुळे राज्यातील थंडीचा जोर वाढणार

Weather Updates l राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. अशातच आता राज्यभर गुलाबी थंडीची चादर पसरली आहे. मात्र आता हवामान विभागाने थंडी संदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. पुढील काही दिवस राज्यभर थंडीचं प्रमाण वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दहा वर्षातील सर्वाधिक कमी तापमान :

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान हे 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात आलं आहे. तसेच मुंबईसह उपनगरात देखील थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईत आज किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे मुंबईतील हे तापमान गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक कमी तापमान आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच पश्चिम उपनगरात देखील गारठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तसेच मुंबईमधील बहुतांश ठिकाणी 16 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी देखील तापमानात आणखी घट झाली आहे. मात्र आता मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Weather Updates l थंडी वाढण्याच नेमकं कारण काय? :

मुंबईत यापूर्वी 2016 मध्ये 16.3 अंश सेल्सिअस एवढं सर्वात कमी तापमान नोंदवले गेलं होत. परंतु, आता मुंबईत पुढील दोन दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच मुंबईत दिवसभराचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे मुंबईकमध्ये दुपारी देखील तापमान आल्हाददायक ठरत आहे.

परंतु, सध्या उत्तर दिशेकडून थंड वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे वेळेआधीच थंडी महाराष्ट्रात दाखल झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरात 3 डिसेंबरनंतर वातावरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. मात्र त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title :  Maharashtra Weather Updates

महत्वाच्या बातम्या –

महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्र्यांसह ‘या’ 20 जणांचा होणार शपथविधी?

आज शनिदेव ‘या’ राशींवर ठेवणार कृपाछत्र!