Weather Updates l भारतात फेंगल चक्रीवादाळाने अनेक राज्यांना तडाखा बसला आहे. यामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र आता या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील थंडीचा जोर देखील कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. अशातच आता ऐन हिवाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
अशातच आता हवामान खात्याने हिवाळ्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आता राज्यातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Weather Updates l थंडीचा जोर कमी का झाला? :
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटल्या होत्या. परंतु, थंड हवेच्या ठिकाणापेक्षा राज्यातील काही ठिकाणं थंडीनं प्रचंड गारठली होती. मात्र फेंगल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालसह हिंद महासागरात देखील जोर वाढला होता.
त्यामुळे आता फेंगलचा मोर्चा आता दक्षिणेसह श्रीलंकेकडे वळाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title – Maharashtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या-
कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…
लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, संभाव्य नावे समोर
आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!