बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप

मुंबई |  महाराष्ट्रातील लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशभरात महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेलं राज्य आहे. मुंबई-पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमधील रोजची कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार ठोस पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आज यासंदर्भात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध लावायचे या अनुषंगाने चर्चा झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तूर्तास तरी संपूर्ण लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

कसा असेल विकेंड लॉकडाऊन?

राज्यात दर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरूवात होईल. तो थेट सोमवारी सकाळीच संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. अत्यावश्यक सेवांना फक्त यामध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनची अधिकृत नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

काय काय बंद राहणार?

राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात बागा, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. याशिवाय याआधीच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवरही सरकारनं बंदी घातलेली आहे. मंदिरात फक्त पुजाऱ्यांना पुजा करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर

उद्धव ठाकरेंना फोन करून फडणवीसांनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

“कोरोना पळून गेलाय, आता मास्क घालण्याची गरज नाही”

विराट कोहलीनं काढलं, शाहरुख खाननं घेतलं; ‘हा’ खेळाडू पुन्हा IPLच्या रणांगणात!

शेवटचं खेळताना पाहा; कारण ‘हे’ तीन दिग्गज पुन्हा IPL खेळण्याची शक्यता नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More