Top News

अयोध्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार का?; शरद पवार म्हणतात…

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अनेक वर्षाच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासीक निर्णय दिला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार का, यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्येच्या निकालावरून महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार नाही. राज्यातील जनता  दोन-तीन दिवसात विसरून जातील. आणि पुन्हा एकदा सांगतो… सेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार आम्ही अद्याप केलेला नाही. आम्ही अजून याची चर्चाही केलेली नाही. राज्यपाल काय करतात ते आम्ही बघतो, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे, सध्याच्या राज्याच्या परिस्थितीवर बोलताना शरद पवारांनी असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिलं मंदिर फिर सरकार, असं ट्विट करत अयोध्या निकालाचं स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या