बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर महाराष्ट्रावर विरोधकांचे उपकार होतील- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढवली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना ईडीच्या कारवायांवरही टीका केली. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही, अशी टीका राऊतांनी केलीये.

आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

“भाजपने ईडी आणि सीबीआयचं वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच बाकीये”

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More