बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच महाराष्ट्र चालेल- अजित पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र हिताशी तडजोड होईल असे कोणतेही निर्णय घेणार नाही आणि घेऊ देणार नाही. शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच हे राज्य चालेल, असा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणाम झाला आहे. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

देशातील एकता आणि अखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. राष्ट्रवादी लोकशाही वाचवण्याचं काम करत आहे, असं देखील अजित पवार म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. कोरोनाशी लढा देत असताना विकासकामं थांबू दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत वेळोवेळी निर्णय घेतले. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

KKR ची टीम अडचणीत; ‘या’ खेळाडूंनी भारतीयांना उद्देशून केलेले जुने ट्विट्स व्हायरल

“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More