बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राला जून महिन्यात ‘इतक्या’ लाख लसीचे डोस मिळणार

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वमभूमीवर देशात सर्वत्र लसीकरण मोहिम वेगाने सुरू झाली आहे. आजपासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचं केंद्राकडून मोफत लसीकरण केलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशभरात 21 जून पासून लसीकरण मोहीम राबविली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र लसींच्या कमतरतेमुळे सर्वांचे लसीकरण होणार की नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राला जून महिन्यात 72 लाख लसीचे डोस देण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले. त्यापैकी 40 लाख डोस आजपर्यंत मिळाले असून 32 लाख डोस 30 जून पर्यंत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात रोज पाच ते सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र मिळणाऱ्या लसीचं प्रमाण त्या तुलनेनं कमी आहे. त्यामुळे 30 ते 44 वयोगटाच्या लोकांना लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

महाराष्ट्रात आजपर्यंत 2 कोटी 75 लाख 76 हजार 177 लोकांचे लसीकरण झाले आहेत. या लसीकरणातील 54 लाख 76 हजार 317 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीचं प्रमाण कमी असल्याचं सध्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मात्र येत्या काळात केंद्राने लस पुरवठा वाढवल्यास पुन्हा लसीकरण वेगाने सुरू करता येणार आहे.

दरम्यान, खाजगी दवाखान्यात कोवॅक्सिन लसीसाठी ₹1,410, कोविशील्ड लसीसाठी ₹790 आणि स्पुतनिक V या लसीसाठी ₹1,145 ही किंमत निश्चित करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

‘या’ गावाने करून दाखवलं; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव ठरलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More