“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई झाली आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी सकाळी छापा पडला यांनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. याविषयी बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी आघाडी सरकारवर ताशेरे ओढल्याचं पहायला मिळालं.
छापा पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र झुकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज सकाळी इन्कम टॅक्सने जी रेड टाकली, ती त्यांच्या तपासाचा भाग आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”
दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”
अजित पवारांना झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा
Comments are closed.