Women Safety l गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारने महिला अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांनतर एक महत्त्वाचं पाऊल उचलल आहे. आता महिलांना पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन स्वरूपाने देखील तक्रार दाखल करता येणार आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सरकारने घेतला मोठा निर्णय :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महिलांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा त्वरित लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचारासारखी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असल्याने हे गुन्हे रोखण्यासाठीचा हा एक वेगळा दृष्टीकोन असणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, राज्यातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये आरोपीला देखील कठोरातील कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. तसेच या प्रकरणांमध्ये आरोपीला थेट फाशीची शिक्षा व्हावी आणि हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
Women Safety l महिलांना त्वरित तक्रार दाखल करता येणार :
महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून महिला, तरुणीवर व चिमुकल्यांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अगदी आठ दिवसांपूर्वी झालेल्या बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. अशातच त्या नराधम आरोपीला कठोर शिक्षेची मागणी देखील राज्यभरातून होत आहे.
अशातच या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन तक्रारीची सुविधा सुरू करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. तसेच आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना देखील त्वरित तक्रार दाखल करणे शक्य होणार आहे आणि या भीतीपोटी अत्याचाराच्या घटना देखील कमी होण्याची शक्यता आहे.
News Title – Maharashtra Women Safety Online Complaint
महत्त्वाच्या बातम्या-
नवीन कार विकत घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कुठे ओसरणार तर कुठे बरसणार?, पावसाबाबत IMD कडून महत्वाची अपडेट
फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
आज ‘या’ 3 राशींचा दिवस वरदानासारखा, सर्व इच्छा पूर्ण होतील!
चित्रपटाची ॲाफर आणि हॅाटेलमध्ये नेऊन… अभिनेत्रीच्या आरोपांनी इंडस्ट्री हादरली