Zika Virus l ऐन थंडीच्या दिवसात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. झिकाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 140 रुग्ण झिकाचे आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यामधील सर्वाधिक म्हणजेच 109 रुग्ण हे पुण्यात आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आहे.
झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ :
झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य विभागाने बीटी ब्यक्त केली आहे. कारण राज्यातील रुग्णांमध्ये जवळपास निम्म्या गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुग्णांच्या सर्वेक्षणावर देखील भर दिला आहे.
यासोबतच राज्यात 2 हजार 68 संशयित झिका रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत देखील पाठविण्यात आले आहेत. त्यातील तब्बल 140 जणांना झिकाचे निदान झाले आहे. तसेच झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आलेल्य 3 ते 5 किलोमीटर परिसरात ताप असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच त्या परिसरात कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील राबविण्यात येत आहेत.
Zika Virus l झिका व्हायरसची लक्षणे :
– ताप
– अंगावर पुरळ येणे
– डोकेदुखी
– सांधे दुखी
– डोळे लाल होणे
– स्नायू दुखणे
या आजाराचा प्रसार हा रक्तसंक्रमणाद्वारे देखील होऊ शकतो. या विषाणूचा गर्भवती महिलांच्या गर्भावर सर्वाधिक परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान, हा संसर्ग बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे मेंदूशी संबंधित आजार उद्भवू शकतात. यातील सर्वात सामान्य दोष म्हणजे मायक्रोसेफली. याशिवाय झिका मुळे गर्भपात यांसारख्या इतर समस्या देखील उद्भवतात.
सर्वात महत्वाचं म्हणजे झिका व्हायरसवर कोणताही ठोस उपचार नसल्यामुळे, तुम्हाला त्याच्या लक्षणांवर उपचार करावे लागतील. अशा परिस्थितीत, संसर्ग होण्यामध्ये हायड्रेटेड राहणे आणि योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे. याशिवाय ताप आणि वेदना कमी करणारी ॲसिटामिनोफेन आणि पॅरासिटामॉल ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे.
News Title : Maharashtra Zika Virus New Cases
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहळांची चर्चा; ट्विट करत म्हणाले…
महागाईचा भडका! ‘या’ साबणांच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार
एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर
धाकधूक वाढली! ‘या’ मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी होणार?
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत