राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

Zika Virus l पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पाणी आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ होते. डेंग्यू, मलेरिया, झिका हे या आजारांपैकी एक आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात आत्तापर्यंत एकूण 80 रुग्ण आढळले :

राज्यात झिका व्हायरसचे तब्बल 80 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजेच तब्बल 66 रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर आता पुण्याच्या पाठोपाठ इतर जिल्ह्यांमध्ये देखील रूग्णसंख्या वाढत चालली आहे.

पुणे शहर – 66
पुणे ग्रामीण – 5
पिंपरी- चिंचवड – 2
अहमदनगर – 4
सांगली – 1
कोल्हापूर – 1
सोलापूर – 1

Zika Virus l झिका व्हायरसची लक्षणे :

– ताप
– अंगावर पुरळ येणे
– डोकेदुखी
– सांधे दुखी
– डोळे लाल होणे
– स्नायू दुखणे

या आजाराचा प्रसार हा रक्तसंक्रमणाद्वारे देखील होऊ शकतो. या विषाणूचा गर्भवती महिलांच्या गर्भावर सर्वाधिक परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान, हा संसर्ग बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे मेंदूशी संबंधित आजार उद्भवू शकतात. यातील सर्वात सामान्य दोष म्हणजे मायक्रोसेफली. याशिवाय झिका मुळे गर्भपात यांसारख्या इतर समस्या देकील उद्भवतात.

सर्वात महत्वाचं म्हणजे झिका व्हायरसवर कोणताही ठोस उपचार नसल्यामुळे, तुम्हाला त्याच्या लक्षणांवर उपचार करावे लागतील. अशा परिस्थितीत, संसर्ग होण्यामध्ये हायड्रेटेड राहणे आणि योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे. याशिवाय ताप आणि वेदना कमी करणारी ॲसिटामिनोफेन आणि पॅरासिटामॉल ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे.

News Title : Maharashtra Zika Virus New Cases

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना

विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना कधी व कुठे पाहता येणार?

रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!

अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?; ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन