Zika Virus l पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टॉयफाईड यांसारखे अनेक आजार डोकं वर काढतात. अशातच सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया या आजाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अशातच आता राज्यात झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या झिकाच्या रुग्ण संख्यांमुळे आरोग्य विभाग देखील सतर्क झाल आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव जास्त प्रमाणात सुरु आहे. अशातच आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण सापडले आहेत याची आकडेवारी समोर आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 128 झिका रुग्णांची नोंद झाली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वाधिक झिका व्हायरसचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असताना मुंबईमध्ये अजून एकाही रुग्णाला झिका व्हायरसची लागण झालेली नाही. तर पुणे महापालिका हद्दीत 91, पुणे ग्रामीण 9, पिंपरी-चिंचवड पालिका 6, अहमदनगर 11, सांगली 1, कोल्हापूर 1, सोलापूर 1 असे एकूण 128 रुग्ण आढळून आले आहेत.
Zika Virus l झिकाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात :
झिकाचे व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील झिका व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
याशिवाय गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या गर्भावर या व्हायरसचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकतात अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सर्व बाबींचा विचार करता आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
News Title – Maharashtra Zika Virus Patient increase
महत्त्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत
राज्यात पुन्हा मविआची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार; कुणी केला दावा?
“..तर तुझाही आजीसारखाच गेम करू”; भाजप नेत्याची राहुल गांधींना थेट धमकी
ऐन सणा सुदीच्या मुहूर्तावर सोनं महागलं, जाणून घ्या आजचे दर
राज्यात ‘या’ भागांवर गडद ढगांची चादर, पुढील दोन दिवस धो-धो बरसणार!