’50 खोके, एकदम ओके’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोध आक्रमक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपूर | नागपूरमधील (Nagpur) हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा विरोधकांनी दिल्यात.

अधिविेशनात महापुरुषांचा अपमान, शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर चर्चा होणार असल्याचं दिसतंय. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. तसेच राज्यातील सत्तांतरानंतरचंही हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-