महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रारात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ‘मातोश्री’वर खासदारांच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

भाजपकडून युतीबाबतीत किंवा जागावाटपांबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

राजकारणात अनेक अदृश्य हात असतात. पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व निधड्या छातीचं आहे. कोणत्याही अदृश्य हातांची आम्हाला गरज वाटत नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, 25 वर्षांपासून आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोशल मीडियावर मोदींची बदनामी करणं ‘या’ पक्षाच्या नेत्याला पडलं महागात

-आता पुण्याच्या दोन मेट्रो स्टेशनवर दिसणार पुणेरी पगडी!

-मला पुणे महापालिकेचं राजकारण उमगलं नाही- शरद पवार

-बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांमध्ये रंगली टस्सल; पाहा कुणी मारली बाजी…

-जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर चिडतो… 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या